नक्षत्रवन


नक्षत्रवन
प्राचीन ज्योतिषविषयक ग्रंथाप्रमाणे 27 नक्षत्रांच्या आराध्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. नक्षत्रवृक्षांच्या सानिध्यात सकारात्मक परिणाम माणसांच्या आरोग्यावर होतात याचा अनुभव घेण्यासाठी अनेक साधक नियमितपणे नक्षत्रवनात साधनेसाठी येतात.
भारतातील पहिले राशी नक्षत्र वन याबद्दलचे दीपक जोशी काका यांचे मनोगत
राशी नक्षत्र वनाबद्दलची संकल्पना माझ्या डोक्यात अनेक वर्ष घोळत होती त्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांचा ज्योतिष शास्त्रातील अनेक लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून भारतातील पहिले राशी नक्षत्र बन तयार केले . यातील काही दुर्मिळ वनस्पती मिळविण्यासाठी अनेक जंगले फिरावे लागली अखेर २००३ स*** त्या प्रत्येक आराध्य वृक्षाचा ऋषीमुनींनी लिहून ठेवल्याप्रमाणे संस्कार हवन केले आणि त्यानंतर त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केली या नक्षत्र वनाचे उद्घाटन माननीय मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले आता आमचे राशी नक्षत्र मोठे झाले आहे त्यातील आराध्य वृक्षांचा अनेक जण लाभ घेत आहेत त्याचा त्यांना फायदाही होत आहे त्यामुळे अशा आपल्या वृक्ष योग्य यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी हा प्रामाणिक प्रयत्न.
आपण पूर्वीपासूनच निसर्गाला देवता मानत आलो आहोत कारण आपले जीवन समृद्ध सुखी व आनंदी करण्यात निसर्गातील या योग्यांचा सिंहाचा वाटा आहे.
आता राशी नक्षत्र उद्यान म्हणजे आपण ज्या राशी नक्षत्रावर जन्मतो त्या जन्मनक्षत्राचा एक आराध्य वृक्ष असतो असे पंचांग करते व ऋषीमुनींनी लिहून ठेवले आहे त्या आराध्य वृक्षाची आराधना उपासना करावी त्याच्या सानिध्यात रहावे वृक्षांच्या पंचांगाचा उपयोग करावा या वृक्ष साधनेत दोन सजीवांची देवाण-घेवाण असते पण वृक्षाचा स्वभाव असा आहे अहो ए शाम वरंजन सर्व प्राणुपजीवन या उक्तीप्रमाणे दातृत्वाचा वसा घेऊन आलेला हा वृक्ष योगी आपल्याला सतत देत राहतो आपले जीवन समृद्ध करतो दिवसभर प्राणवायू देऊन सर्व विश्वाला चेतना देतो निरपेक्ष असे जीवन त्याचे सुरूच असते वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे तुकाराम महाराज म्हणतात पण त्याही पलीकडे चे नाते वृक्ष जोडते.
