श्री गणेशपत्रीवन


श्री गणेशपत्रीवन
श्री गणेशांच्या पूजेत विलक्षण औषधी उपयोगिता असणाऱ्या 21 वृक्ष वनस्पतींची पाने अर्पण केली जातात या सर्दी झाडांच्या मंत्रशास्त्राच्या प्रयोगांनी संस्कारीत करून एक वन उभे केले आहे.
गणेश पत्री वन बद्दल दीपक जोशी काका यांचे मनोगत
राशी उपवनाच्या रचनेबरोबरच माझ्या डोक्यात अनेक वनांची आखणी चालूच होती त्या विषयक अभ्यास चालूच होता पौराणिक ग्रंथांचा अभ्यास चालूच होता गणेशाने अंगीकारलेल्या वनस्पती बऱ्याच जणांना माहिती आहेत परंतु गणेशाने वेगवेगळ्या कारणांनी त्या परिधान केल्या त्याचाही अभ्यास मुदगल पुराण गणेश पुराण अशा अनेक पुराणातून केला मुद्गल पुराणात फक्त चार पत्रींचा उल्लेख आहे परंतु इतर ग्रंथांच्या गणेशाच्या आवडीच्या 21 वनस्पती आहेत असे समजते या सगळ्या औषधी वनस्पती आहेत गणपती हा सिद्धी दाता व बुद्धी दाता आहे सिद्धी म्हणजे यशस्विता कार्यसिद्धी व बुद्धी बौद्धिक प्रेरणा देणारी शक्ती देणारा गणेश आहे त्याचे अनन्य साधारण महत्व आहे "ब्राह्मणस्पतीसूक्त" हे गणेश महिमाचे सर्वश्रेष्ठ सूक्त आहे तर अथर्वशीर्ष नितांत रम्य वैज्ञानिक सूक्त आहे गणपतीला मुख्यतः राष्ट्रीय देवता मानतात हे गणेशाचे महात्म्य सर्वांनाच ज्ञात आहेत परंतु गणेश या 21पत्री अंगीकारल्या त्यामागे कारण असावेच या पत्रीचे आयुर्वेदात अनन्य साधारण महत्व पटवून दिले आहे त्या प्रत्येक पत्रीचा किंवा त्यातील वृक्षाच्या पंचांगाचाही आयुर्वेदिक उपयोग आहे. या ओंकार स्वरूप देवतेला म्हणजेच गणरायाला वंदन करितो
